prabodhini news logo
Home चंद्रपूर मोहबोडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन

मोहबोडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन

0
85

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सिंदेवाही : माळी समाज तथा क्रांतीज्योती युवा फाउंडेशन मोहबोडी द्वारा आयोजित 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सकाळी 8 वाजता ग्राम स्वच्छता अभियान, सकाळी 9 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची गावातून शोभायात्रा काढून कार्यक्रम स्थळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामचंद्रजी श्रीरामे, सरपंच ग्रामपंचायत, कुकडहेटी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाबुरावजी गेडाम, माजी उपसभापती पं. स. सिंदेवाही, राजपाल खोब्रागडेअध्यक्ष भा. बौ. महा. चंद्रपूर जि. पूर्व, चंद्रमनी खोब्रागडे, माजी सरपंच ग्रा. पं. मोहाळी, जीवन भरडे, सामाजिक कार्यकता, विसापूर तर विशेष अतिथी म्हणून गुलाब मेश्राम, मधुकर गुरनुले, जयेश मोहुर्ले, गिरमाजी लेनगुरे, बळीराम मोहुर्ले, मनोहर मोहुर्ले, भुजंगराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमांमध्ये क्रांतीज्योती युवा फाउंडेशन यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे गाव पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा समाज गौरव गौरव पुरस्काराने सन्मानित व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार आहे. त्यानंतर 2 वाजता महिला मेळाव्याचे आयोजन आयोजन व चर्चासत्र आणि नंतर त्यासोबतच महिलांचे व मुला-मुलींच्या विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता गावसह भोजनानंतर रात्री 8 वाजता महिलांचे व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माळी समाज तथा क्रांतीज्योती युवा फाउंडेशन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोहबोडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here