prabodhini news logo
Home कोरपणा क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे कार्य हे प्रेरणादायी

क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे कार्य हे प्रेरणादायी

0
97

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – गडचांदूर: क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले यांचे कार्य स्त्री सक्षमीकरणाकरिता व स्त्रियांच्या उत्थानाकरिता निश्चितच प्रेरणादायी स्वरूपाचे असल्याचे प्रतिपादन एफ इ एस गर्ल्स कॉलेजच्या प्राध्यापिका धनश्री चिताडे यांनी केले. युग चेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था संचलित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोह प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. छाया गायकवाड होत्या. यावेळी प्रा. अंजना पवार, प्रा. पल्लवी वरकड, प्रा. क्रांती कासले, प्रा. दुर्गावती खुबाळकर, कुंजम शेंडे, अर्चना मुत्यलवार आदी उपस्थित होते. मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून दीप प्रज्वलन केले. सामूहिक वंदनेनंतर सावित्रीबाई फुले यांच्या कार्य- कर्तृत्वाला उजाळा देणारी भाषणे झाली. सावित्रीबाईंचे सामाजिक, शैक्षणिक कार्याबरोबरच साहित्य विषयक कार्य ही महत्त्वपूर्ण असल्याचे पुढे बोलताना प्रा.धनश्री चिताडे यांनी सांगितले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य गायकवाड यांनी सावित्रीबाईंच्या कार्यांचा ऐतिहासिक आढावा घेत आजच्या पिढीने सावित्रीबाईंचे उपकार कायम लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.दुर्गावती खुबाळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कुंजम शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , यश ताकसांडे, रविंद्र चव्हाण, वैभव ताजने स्वप्निल पिंपळकर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here