prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – रातराणी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – रातराणी

0
95

फुलांच्या बागेत आज
मंद वारा सळसळला
मोगऱ्यास भेटूनिया
अंतरात आनंदला

अंगणात घुमला वेडा
वृक्षवल्लीस भेटूनी
खुळावला बहरलेली
रातराणी पाहुनी

पौर्णिमेची चांदरात
रातराणीचा सुगंध
दरवळला भवताल
साजनाची प्रीत धुंद

हात हाती गुंफुनिया
झुलते झुल्यावरी
संसाराचे गोड चित्र
रेखाटते अंतरी

चंदेरी रातीला शोभते
काळोखाची किनार
रातराणी उमलताना
वेडावला शिवार

सौ.वंदना शशिकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here