
इवलेसे बी रोवले ज्ञानाचे
समर्पण त्या थोर आईचे
सामर्थ्य त्यांच्या अंगीचे
झेलले गोळे शेण मातीचे
महान कार्य त्या माऊलीचे
करी कंकण बांधून शिक्षणाचे
महिलांच्या सबलीकरणाचे
साकारले स्वप्न मुलींच्या शाळेचे
इवल्याश्या रोपाचा वटवृक्ष झाला
सर्व क्षेत्रात महिलांनी प्रवेश केला
स्वावलंबी झाल्या साऱ्या महिला
सलाम सावित्रीबाईंच्या कार्याला
सावित्रीच्या आम्ही लेकी म्हणून
वाटतो आम्हा तुमचा अभिमान
नमन त्रिवार चरण स्पर्शून
महिलाना दिलेत मानाचे स्थान
प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव















