prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे कविता – वेळ

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे कविता – वेळ

0
106

उद्या करायचे ते आज कर
आज करायचे ते आत्ता
करु करु म्हणून नको मारु बाता
नुकसान तुझेच दुर्लक्ष होता ||१||

किती बहाणे, किती कारणे
टाळते रहावे आळशीपणे
गळ्याशी येता सदा चिडणे
ह्यास न सुसंस्कृतपणा म्हणणे ||२||

म्हणून जाणा महत्त्व आजचे
वर्तमानात जगणे फायद्याचे
विचार असावे भविष्याचे
सबबी सांगणे काय कामाचे ||३||

नक्की मनाशी ठरवावी एक खूणगाठ
गुंता सहजी सोडवून बांधावी निरगाठ
कारण वेळेत नाही केले तर काही होत नाही
आणि उद्या उद्या करत, उद्या कधी येत नाही||४||

स्वरचित
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here