prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वेळ

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वेळ

0
97

कामे करावी वेळेवर
वेळ येत नाही परत ;
हातून निसटल्यावर
रहावे लागते झुरत….(१)

इज्जत करावी वेळेची
पैशाहूनही अनमोल ;
दुर्लक्षित केले तर
आयुष्य होई मातीमोल….(२)

ढकलू नये कधीही
आजचे काम उद्यावर ;
उरकून घ्यावे आत्ताच
राहील तेच फायद्यावर. ….(३)

वेळेतच गुंतलं आहे
आयुष्याचं गणित ;
सोडवावं नित्यनेमाने
मिळे यशाचं फलित……(४)

करु नये वेळकाढूपणा
रहावे सदा कार्यतत्पर ;
आळसाला देता मूठमाती
मिळे समाधानाचे उत्तर….(५)

जगण्याच्या वाटेवर
जाणावे वेळेचे महत्त्व ;
चालावे वेळेसोबतच
पाळावे वेळेचे तत्त्व……(६)

रवि ताकसांडे
गडचांदुर जि. चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here