
स्वामी विवेकानंद हे भारतातील महान आध्यात्मिक नेते आणि विचारवंतापैकी एक होते. जे भारतीय तत्वज्ञान जगाला सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
प्रारभिक जीवन
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. भारतातील त्यांचे मुळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. ते बुद्धिमान, जिज्ञासू, आणि लहानपणापासूनच धर्म, तत्वज्ञान आणि सत्यावर विश्वास असलेले होते.
आध्यात्मिक प्रवास
स्वामी विवेकानंद ते एक महान संत श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य बनले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्रनाथांना सर्व धर्म एकाच सत्याकडे घेऊन जातात ही कल्पना समजली. संत श्री रामकृष्ण परमहंसच्या निधनानंतर ते भिक्षू बनले, आणि त्यांनी स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले.
जागतिक मान्यता
1993 साली अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांनी केलेल्या भाषणानंतर त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेतील माझ्या “बंधू आणि भगिनींनो” या त्यांच्या शब्दांना उभे राहून प्रचंड टाळ्या वाजवल्या गेल्या. बौद्ध धम्मातर्फे अनागारिक धम्मपाल यांनी त्यांना भाषणाची संधी द्यावी म्हणून शिफारस केली होती. ही संधी मिळाल्यामुळे त्यांनी भाषणाद्वारे जगाला हिंदू तत्वज्ञानातून वैश्विक बंधुत्वाबद्दलची शिकवण देता आली. शिक्षण आणि कल्पना सर्व धर्माची शिकवण, सर्व धर्माची एकता, मानवतेची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आत्मबल, आत्मविश्वास वाढवावा, शिक्षणाने केवळ माहितीचे आदान प्रदान न करता चारित्र्य घडवावे अशी शिकवण त्यांनी दिली. सुरुवातीला शिकागो मध्ये आयोजकांनी हिंदू धर्माचे प्रवक्ते म्हणून प्रमाणपत्र मागितले ते त्यांच्याकडे नव्हते.
स्वामी विवेकानंदाला अनागारिक धम्मपालाचे शिफारस प्रमाणपत्र
अनागारिक धम्मपाल श्रीलंकेत अनेक लोकांना भेटून भारतातील महाबोधी महाविहाराची सत्य परिस्थिती कथन केली. याच दरम्यान त्यांनी जगातील अनेक वृत्तपत्रात महाबोधी महाविहाराची दुरावस्था बाबत लेखन केले. त्यामुळे जागतिक स्थरावर बुद्धगया येथील महाविहाराच्या दुरावस्थे बद्दल चर्चा होऊ लागली. श्रीलंकेतील वास्तव्यात त्यांनी गरीब मुलामुलींसाठी शाळा सुरु केल्या. तेथील धम्म जागृती आपल्या विश्वासू सहकाऱ्यांकडे सुपूर्द करत पुन्हा भारतात आले. महाबोधी महाविहारात बुद्धरुपा समोर नतमस्तक होत असतानाच त्यांनी दृढ निश्चय केला कि जो पर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येत नाही तो पर्यंत ते मायदेशी परतणार नाहीत आणि शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा चालू ठेवला. अनागारिक धम्मपाल यांच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. 1893 साली शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत त्यांना बौद्ध धम्माचे प्रतिनिधित्व करण्याची विनंती करण्यात आली. याच प्रवासात आणि शिकागो मध्ये त्यांची स्वामी विवेकानंदांशी भेट झाली आणि दोघात बौद्ध धम्मात असलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता बद्दल चर्चा झाली. या चर्चेने विवेकानंद खूप प्रभावित झाले. शिकागो येथील परिषदेत अनागारिक धम्मपालांनी मांडलेले जागतिक सहिष्णुता, बंधुता आणि शांती बद्दलचे बौद्ध विचार प्रभावशाली होते आणि तेथील वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली. स्वामी विवेकानंद युवा वर्गाला संदेश देतात जर तुम्हाला भारताचे भविष्य घडवायचे असेल तर ब्राह्मणवादाला पायाखाली चिरडून टाका, प्रतिगामी शक्तीला वर येऊ देऊ नका. 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे “जागतिक धर्म” परिषद भरली होती. तेव्हा स्वामी विवेकानंद परिषदेत भाषण देण्यासाठी आले होते. त्यांनी जागतिक धर्म परिषदेत भाषण देण्यासाठी आयोजकांकडे परवानगी मागितली होती. आयोजकांनी त्यांनी तुम्ही हिंदू धर्माचे प्रवक्ते असल्याचे सिद्ध करणारे प्रमाणपत्र मागितले. त्यावेळी स्वामी विवेकानंदानी शिकागोहून भारताच्या शंकराचार्याकडे एक तार पाठविली होती. त्यात नमूद केले होते की मला हिंदू धर्माचा समर्थक म्हणून माझी भूमिका सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, तरी कृपया प्रमाणपत्र पाठविण्यात यावे. परंतु प्रमाणपत्र पाठविण्यात आले नाही. सर्व धामाचे शंकराचार्य ब्राह्मण जातीचे असतात. शंकराचार्य हे पद ब्राह्मण जातीसाठी नेहमी आरक्षित असते. त्यावर शंकराचार्यांनी उत्तर दिले की “तुम्ही ब्राम्हण नाही” तुम्ही शूद्र जातीचे आहात. त्यामुळे तुम्हाला हिंदू धर्माचे प्रवक्ते बनवता येणार नाही. शंकराचार्याचा जातीयवाद आणि भेदभाव पाहून स्वामी विवेकानंदजीना फार दुःख झाले. ब्राम्हणवादी वृत्तीमुळे त्यांच्या व देशाच्या प्रगतीत अडथळा आल्यासारखे वाटले. स्वामी विवेकानंदजींचे दुःख पाहून तेथे उपस्थित असलेले श्रीलंकेतील “बौद्ध धम्माचे” प्रवक्ते अनागारिक धम्मपाल बौद्ध यांनी आयोजकांना त्यांच्या वतीने स्वामी विवेकानंद यांना बोलण्याविषयी संमतीपत्र दिले, त्यांच्या भाषणातील थोडा वेळ काढून स्वामीजींना दिला. शिफारस पत्रात नमूद केले होते की स्वामी विवेकानंद एक विद्वान आणि शक्तिशाली वक्ते आहेत. त्यानंतर स्वामीजींना धर्म संसदेत बोलण्याची संधी देण्यात आली. हिंदू धर्मग्रंथामुळे ब्राम्हणांनी स्वामीजींना शिकागो येथील धर्म संसदेत बोलण्याच्या अधिकार दिला नव्हता. स्वामी विवेकानंदांना अनागरिक धम्मपालाच्या भाषणातील केवळ पाच मिनिट देण्यात आले. त्या पाच मिनिटात स्वामीजींनी त्यांचे भाषण दिले. ही पाच मिनिटांची बोलण्याची संधी दिल्यामुळे त्या भाषणासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार मिळाला. ब्राह्मणाचे प्रमाणपत्र असले म्हणजेच प्रवक्ता होता येते असे काही नाही. अशाच प्रकाराचा ब्राम्हणांनी शिवाजी महाराज शूद्र आहेत म्हणून राज्याभिषेक करण्याचा नाकारला होता. परंतु शिवाजी महाराजांनी वेळ मारून नेली. पुन्हा तीन महिन्यानंतर दुसरा राज्याभिषेक शाक्त पद्धतीने केला. शाक्त पद्धत ही बौध्द पद्धत होय.
*स्वामी विवेकानंदांचे योगदान.*
1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना त्यांनी केली. जी शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक सेवेवर लक्ष केंद्रित करत होती . भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला आणि तरुणांना भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा अभिमान वाटला पाहिजे त्यासाठी ते म्हणतात “ उठा, जागे व्हा, आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.”
मृत्यू आणि वारसा
स्वामी विवेकानंद यांचे 4 जुलै 1902 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी तरुण वयात निधन झाले. त्यांचा जन्म दिवस हा भारतात दरवर्षी “युवा दिन” म्हणून साजरा केला जातो. थोडक्यात स्वामी विवेकानंद हे एक आध्यात्मिक गुरू होते. ज्यांनी भारताचा आत्मविश्वास जागृत केला आणि जगाला सहिष्णुता सेवा आणि आंतरिक शक्तीची मूल्ये शिकवली
स्वामी विवेकानंद म्हणतात “तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही. बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता, तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही. असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही. काय सामर्थ्य होते पाहा. जुलमी ब्राह्मणांच्या सत्तेसमोरही हा माणूस वाकला नाही. उभा राहिला. तेवत राहिला…” असे साक्षात स्वामी विवेकानंद. हिंदुत्वाचा ध्वज जगभर घेऊन जाणारे स्वामी विवेकानंद 1900 मध्ये तथागत गौतम बुद्धांविषयी कॅलिफोर्नियात बोलत होते. भारताची जगभरातली खरी ओळख आजही “बुद्धांचा देश” हीच आहे.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















