prabodhini news logo
Home कारंजा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – मानवतेचे महापुजारी विवेकानंद...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – मानवतेचे महापुजारी विवेकानंद स्वामी

0
86

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस युवक दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, यावरून आपल्याला लक्षात येते की राष्ट्र निर्माणात युवकाचे महत्त्व स्वामी विवेकानंद यांना माहीत होते, स्वामी विवेकानंदांनी सर्व व्याख्याने युवकांना उद्देशून दिली , त्यांचे विचार एकून एकप्रकारे आपल्यामध्ये उर्जा संचारते , महापुरुषांच्या विचाराने लढण्याचे बळ येते, विवेकानंद स्वामी म्हणतात.
माणूस प्रकृती वर मात करण्यासाठी जन्माला आला प्रकृती चा गुलाम होऊन राहण्यासाठी नव्हे…..
स्वतंत्र होण्याचे धाडस करा , तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याच धाडस करा, त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा येईल.
आपले मज्जातंतू शक्ती संपन्न करा , आपल्याला लोखंडी स्नायूची व पोलादी मज्जातंतूची आवश्यकता आहे , आपण
पुष्कळ दिवस रडलो, आता रडणे पुरे, आता आपल्या पायावर उभे रहा, मणुष्य बना, खरोखरच स्वामी विवेकानंदाचे विचार खुप मोलाचेआहे १२जानेवारी १८६३ ला त्यांचा जन्म झाला होता.
भारत देश हा महापुरुषाचा देश आहे त्यांच्या विचारातून सकारात्मक संदेश मिळतो .

स्वामी विवेकानंद कोण होते – एक धर्म गुरू एक धार्मिक पुरूष -एक प्रवचनकार परिवाराच्या चौकटीत छान पणे बसणारा एक दक्ष हिंदू – परिवर्तनाच्या चळवळीतील – अग्रदूत
या देशातील पहिला साम्यवादी, अंधारात चाचपडत फार कल्पकतेने आणि प्रयत्न पुर्वक आपला मार्ग शोधणारे एक सत्यवादी स्वामी विवेकानंद हे एक महान तत्वज्ञानी हिंदू
सन्यासी आणि साधी राहणी आणि उच्च विचार सारणी च्या
मंत्रावर विश्वास ठेवणारे आध्यात्मिक नेते होते.
निस्वार्थी मानवसेवा हाच खरा धर्म होय. असे त्यांनी
आग्रह पुर्वक प्रतिपादन केले. मानवी चरित्र घडविणारी
कर्म शक्ती ही सर्वांपेक्षा प्रबळ होय.पाश्चिमात्य जगात त्यांनी
भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दुत म्हणून
मुख्य भूमिका बजावली.
१२जानेवारी १८६३ ला त्यांचा जन्म कलकत्ता येथे एका बंगाली कुटुंबात झाला.
स्वामी विवेकानंदानी अगदी लहान वयातच आधुनिक
वेदांत व राजयोगाच्या प्रवचनाने जगाला हरवले, स्वामी विवेकानंद म्हणतात जे काही चांगले आहे ते इतरांकडून शिका, तुला जे वाटतं ते तु असशील, जर तुम्ही स्वतः ला कमकुवत समजत असाल तर तुम्ही कमकुवत व्हाल, तुम्ही स्वत: ला मजबूत समज असाल तर मजबूत व्हाल, त्यांनी अमेरिकेमधून आमलबाजार मठातील सर्व गुरू बंधूना २७ एप्रिल १८९६ रोजी पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटलयं पुर्वीचे देव आता जुने झालेत आता आपल्यापुढे नवा भारत आहे, नवा देव आहे, नवा धर्म आहे, आणि नवे वेद आहे, हे प्रभो प्राचीन गोष्टींचा सदासर्वदा विचार करण्या पासून आमचा देश कधी मुक्त होईल. “म्हणजे खरं तर देवाला रिटायर करा ” हे सर्व प्रथम सांगितले.
नंतर २७ आक्टोबर १८९४ रोजी वाशिंग्टन हून पाठविलेल्या पत्रात अनुयायांना सांगितले जो धर्म वा जो इश्वर विधवांचे अश्रू पुसत नाही किंवा पोरक्या अनाथ बालकाच्या मुखात अन्नाचा घास घालीत नाहीत. त्या धर्मावर माझा विश्वास नाही आणि इश्वरावरही माझा विश्वास नाही.
एखाद्या धर्माची तत्वे कितीही सुंदर असोत त्यामधे सुक्ष्म आणि सखोल सिध्दांत असोत परंतु जोपर्यंत ते व्यवहारात येत नाही तोपर्यंत मी त्याला धर्म हे नाव ठेवणार नाही….. डोळे आपल्या पाठीमागे नाही समोर आहे, मला माणूस घडवणारा धर्म हवा आहे.
हिंदूनी धर्म सोडण्याची गरज नाही. मात्र धर्माला योग्य सिमेत ठेवून समाजाला स्वतः ची उन्नती प्रगती व विकास करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.
हिंदू लोक नेहमी सामान्य सत्याकडून विशेष सत्याकडे जाण्याचा प्रयत्न करतात विशेष सत्याकडून सामान्य सत्याकडे नव्हे, आपल्या सामान्य तत्त्वज्ञानामधे आपल्याला काय आढळतं? एखादा सामान्य सिध्दांत गृहीत धरून हे तत्वज्ञ खुप किस काढत बसतात मग तो सिध्दांत कितीही भ्रमात्मक किंवा पोरकट का असेना असल्या सिध्दांतामधे किती सत्यता आहे
हे शोधून काढण्याची कोणाला उत्कंठा का नाही.
म्हणून स्वतंत्र रितीने विचार करण्याची शक्ती आपल्याकडे
जवळजवळ नाहीच . नंतर ते म्हणतात मी कोण आहे हे ध्यानात आहे का ? मी सुद्धा असाच ध्यानाच्या अधिस्ठानावर उभा राहून धर्माचं वेड पांघरलेला माणूस आहे, मला अशा प्रकारच्या कार्यकर्त्याचा गट उभा करावयाचा आहे. धर्मवेड हा जणू मेंदूला होणारा एक रोग आहे आणि त्यामुळे समाजाची फार हाणी होते.
जरूरी आहे ती धर्माचं वेड पांघरलेल्या ज्ञानी पुरुषाची!
ते स्पष्ट पणे सांगतात मी दार्शनिक नाही, मी संत नाही, तत्वज्ञ नाही, मी गरिब आहे. आणि मला गरिबाविषयी प्रेम वाटतं या देशात गरिब कोण मी पाहिलेलं आहे. या देशात दारिद्र्य गरिबी अज्ञान यांनी गांजलेल्या भारतीयांबद्दल आपल्यातील कोणी काही करतं का कोण त्यांच्या दारात जाऊन त्यांना शिक्षण देईल. ते अंधारातून प्रकाशात कधी येणार हे लोक म्हणजेच तुमचे इश्वर त्यांच्याच कल्याणाची चिंता पहा.
त्यांच्या साठीच कर्म करा ज्याच हृदय गरिबांसाठी द्रवत त्यालाच मी” महात्मा ” म्हणतो. नाहीतर तो दुरात्माच होय कदाचित मृत्यूपुर्व आपण सफल होणारही नाही.
पण लक्षात ठेवा की आपल्या विचाराचा एक कण देखील नष्ट होणार नाही. त्या विचाराचा आज ना उद्या परिणाम होईलच होईलच . शिक्षण म्हणजे ज्ञान , कौशल्य, मुल्य आणि सवयी मिळविण्याची आणि विकसित करण्याची एक” प्रक्रिया “आहे जी व्यक्तीच्या सर्वागीण विकासासाठी
मदत करते. यात केवळ पुस्तकी ज्ञान नसून अनुभव तर्क
आणि विचार शक्तीच्या विकासाचाही समावेश होतो.
ज्यामुळे व्यक्ती पौढ जीवनासाठी तयार होते आणि जगाला
समजून घेण्यास सक्षम होते. असे स्वामी विवेकानंद यांचे विचार, पण विवेकानंदांच्या ज्वालाग्राही विचाराचे काय झाले? एकतर विवेकानंद यांना आयुष्य फार कमी म्हणजे एकोणचाळीस वर्षाचे मिळाले त्यातील शेवटची चार पाच वर्षे त्याची प्रकृती फार ढासळली रक्तदाब, मधूमेह, अस्थमा अशा अनेक छोट्या मोठ्या व्याधीने व्यापलेले, त्यातही त्यांची अविश्रांत भटकंती सुरू राहीली त्यांचे हे विचार धण त्यांना एकत्र साठवून एका ग्रंथात ठेवता आले नाही. ते विखुरलेले राहीले कदाचित ते तसेच ठेवणे ती त्यांची व्युहरचना असेल .
सनातन हिंदू धर्मातील शिष्यांना विवेकानंद पचविने कठीण होते, त्यातून त्यांचे हे विचार ऐकल्यावर त्यांना शिष्य फार कमी मिळाले, आणि या विचारांना पाप समजणाऱ्या समाजाने आर्थिक सहाय्य फार कमी केले.

समाजाला समानतेच्या धाग्यात गोवून ठेवणाऱ्या
या थोर महापुरुषांच्या संघर्ष कार्याला शतशः प्रणाम

नंदा भगत
कारंजा लाड, वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here