
माझ्यासाठी खास मला
वेळ कधीच मिळत नाही
स्वयंपाक घरात प्रत्येकाची
आवड निवड जपत राही
रोज दुपारी नक्की ठरवते
लेखन करायचं पक्क करते
भोजनानंतर सुस्ती येते
लेखणी वहीत पडून रहाते
बाजारातून भाजीपाला
भाव करून घेऊन येते
भात आमटी भाजी पोळी
यातच वेळ निघून जाते
धुणी भांडी साफ सफाई
वेळेचा काटा सरकत राहातो
घरातल्यांच्या आवडी निवडी
पुरवताना घाम फुटतो
स्वतःसाठी वेळ मोलाचा
शोधत आहे केव्हाचा
कधीतरी मिळेल का
मोकळा श्वास सुखाचा
संसाराच्या रहाटगाड्यात
जुंपून घेतले स्वतःला
एक क्षण माझ्यासाठी
मीच द्यायला हवा मला
सौ. वंदना शशिकांत पाटील
मुंबई















