prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वेळ

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वेळ

0
73

काळ हा बलवान आहे
कुणासाठी थांबत नाही
काळाची गती निराळी
तो भरभर पुढेच जाई

जन काळ वेळ जाणूनी
जर काम करती वेळेत
ते सदैव यशस्वी होत
जातील पुढील काळात

यात नसे शंकाच शूरवीर
नर हे वेळेचे जाणून मर्म
टाकती इतिहास बदलून
पराक्रमाने तेच त्याचे कर्म

युगपुरुष आंबेडकरांनी
भारतीय संविधान लिहिले
समाज कल्याणासाठी
आपले आयुष्य वेचले

वेळेचे महत्त्व जाणता
वेळेचे करू नियोजन
वेळ अमोल आहे आपण
सर्व करू वेळेचे पालन

निर्मला बोरकर
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here