
“वेळ हासवते वेळ रडवते
ती वेळच तर आहे
जी सर्व काही करविते”
वेळ ही मानवाच्या जिवनात अतिशय महत्त्वाची आहे, वेळेचा सदुउपयोग जर नाही केला तर माणसाला बरेच गोष्टी पासून मुकावे लागते, संताची भुमी असलेल्या भारत देशात वेळोवेळी अनेक थोर पुरुषानी आप आपल्या कर्तबगारीने इतिहास रचवीला,ति वेळच होती, कि त्या काळी फुले शाहू आंबेडकरासारखे थोर समाजसुधारक व महापुरुष ज्यांनी देशातील रुढी प्रथा पंरपरा बंद करून बालहत्या, विधवा, पुनर्विवाह, सतीप्रथा, समता, बंधुता, प्रस्थापित केली व सर्वसामान्य माणसांला माणूसकी ने जगण्याचा अधिकार दिला, हे सर्व करत असताना त्यांनी काय कमावले काय गमावले हे मात्र ती वेळच सांगून जाते, डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान हे भारतीय नागरिकांना मिळालेले वरदान आहे, संविधानाने दिलेले हक्क व अधिकार हे माणसाला त्या त्या वेळेनुसार जगण्याची कला शिकविते, जसे या धरतीला संत महात्मा लाभले तसेच बऱ्याच स्त्रियानी सूद्धा देश घडविण्यात आपले मोलाचे योगदान दिले, त्या वेळी जर या महान स्त्रियांनी आमुलाग्र बदल केले नसते तर आज काही वेगळीच परिस्थिती असती, तरीपण आजच्या आधुनिक काळात वेळ संपूर्ण पणे बदलली आहे, चोहीकडे अराजकता माजलेली आहे, बलात्कार, भ्रष्टाचार, यासारख्या घटनांनी देश हादरला असून याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे, नाही तर पुन्हा एकदा देश अधोगती कडे गेल्या शिवाय राहणार नाही, देशाचे हित साधायचे असेल तर पुन्हा एकदा या महापुरुषांच्या विचाराचे समाजात बिज रोवने या वेळेला खूप महत्त्वाचे आहे, वेळ ही नुसतिच कोणासाठी थांबत नाही म्हणून समाजात परिवर्तन करायचे असेल किंवा प्रगत समाज बनवायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जोपासून
“शिका, संघटित व्हा,, व संघर्ष करा हा मूलमंत्र जगाला देणे ही आताच्या वेळेस व काळाची गरज आहे, आज प्रत्येक क्षण हा आनंदाने जोपासने व वेळेचे भान ठेवून जात, धर्म, पंथ बाजुला ठेवून माणुसकी हा धर्म अंगिकारने काळाची गरज आहे, थोडक्यात काव्य प्रकारात वेळेचे महत्त्व मांडते.
आयुष्याच्या वाटेवरती वेळ ही निछित ठरली
उणे-दुणे काहीच नाही कळले लेखाजोखा करता करता वेळ ही अपुरी ठरली
काय कमावले काय गमावले,
हिशेबाची वही ती वेळच ठरली
वाटले मनाला जिंकेल जग मी वेळेत
पण कुणास ठावुक
नियतीने वेळ च ती ठराविक धरली,
तात्पर्य-वेळ ही कुणासाठी च थांबत नाही, वेळेचा सदुउपयोग करून माणुसकी जपता आली पाहिजे, जीवन हे क्षणभंगुर आहे उदयाला काय होईल हे कुणालाच माहीत नाही म्हणून मिळालेले आयुष्य हे मनसोक्त जगुण घेऊयात कारण वेळ ही कुणालाच थांबत नाही..
कुमुद फुलझेले नागपूर















