prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्रात साहित्य समूह तर्फे विशेष कविता – स्वामी विवेकानंद

प्रबोधिनी मंच महाराष्ट्रात साहित्य समूह तर्फे विशेष कविता – स्वामी विवेकानंद

0
101

तरुणाईचा आदर्श
विचार लावतात छंद
बहारदार व्यक्तिमत्त्व
युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद(१)

उठा जागे व्हा- गर्जना
आत्मविश्वास मनात भरते
मनामनात नव विचाराची
तेजस्वी शक्ती पेरते (२)

मानवतेचा दिला संदेश
उत्साह मनी जागविला
विश्वात भारतीय संस्कृतीचा
शांतिदीप उजळविला (३)

श्रद्धा विश्वास निडरता
गुण आत्मसात करावे
अंधारलेल्या वाटेवर
ज्ञानाचे दीप लावावे (४)

बंधू भगिनी शब्दाने
विश्वास जगाचा जिंकला
अजरामर विचारांनी
इतिहास नवा घडला(५)

डॉ.स्मिता गजभिये /तिरपुडे
लाखनी, जिल्हा. भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here