prabodhini news logo
Home चंद्रपूर कोट्यावधींचा खर्च, मात्र जनता अजूनही तहानलेलीच…

कोट्यावधींचा खर्च, मात्र जनता अजूनही तहानलेलीच…

0
125

उज्वला नगराळे महिला जिल्हा संपादिका प्रबोधिनी न्युज – आज चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक – 2 शास्त्रीनगर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सचिन कत्याल , अनुसया दहेगावकर, विद्या ठाकरे, प्रतिक्षा सिडाम यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभेला संबोधित केले.

भाजपने पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही शहरातील नागरिक आजही पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहेत. हा खर्च गेला कुठे हा खरा प्रश्न आहे. हर घर नल, अमृत योजना, जलजीवन मिशन अशा योजनांच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रभागांमध्ये नळ कोरडेच आहेत. उन्हाळा असो वा पावसाळा, नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

पाणीपुरवठा योजनांमधील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट कामे आणि नियोजनाचा अभाव यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे. कोट्यवधींची बिले काढली जातात, पण जमिनीवर काम दिसत नाही. पाणी कुठे अडते, कोणाच्या खिशात जाते, याची चौकशी होणार का? पाणी हा मूलभूत हक्क असून तो देण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. महिला, वृद्ध, लहान मुले रोज पाण्यासाठी संघर्ष करत असताना सत्ताधारी मात्र उद्घाटनांच्या फिती कापण्यात व्यस्त आहेत.

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पाणीपुरवठा व्यवस्थेची सखोल चौकशी, पारदर्शक अंमलबजावणी आणि प्रत्येक घरापर्यंत नियमित पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही दिली.

या प्रसंगी प्रामुख्याने ज्येष्ठ काँग्रेस नेते विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर, प्रमोद बोरीकर, कुणाल चहारे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here