prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकला, भ्रष्ट भाजपाचा झाला पराभव

चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकला, भ्रष्ट भाजपाचा झाला पराभव

0
300

चाळीस हून अधिक नगरसेवकांच्या जोरावर काँग्रेसचा महापौर चंद्रपूर मध्ये बसणार, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट

भाजपच्या भ्रष्ट कारभाराला जनतेने नाकारले,विजय वडेट्टीवार यांची टीका

प्रशांत रामटेके/नम्रता सरदार संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ६६ पैकी २८ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवत महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवला. चंद्रपूर महापालिकेतील भाजपचे अपयशी, आणि जनविरोधी कारभाराला जनतेने नाकारले, अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.या विजयाने संपूर्ण चंद्रपूर शहरात काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष, फटाके व गुलाल उधळून हा विजय साजरा करण्यात आला.

आजच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले,
भाजपच्या भ्रष्ट धोरणांमुळे, फसव्या घोषणा आणि सत्तेच्या अहंकारामुळेच जनतेने भाजपला नाकारले आहे. चंद्रपूरकरांनी विकास, पारदर्शकता आणि जनहितासाठी काँग्रेसवर पुन्हा विश्वास टाकला आहे.
महागाई, बेरोजगारी, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा, बोगस पट्टे वाटप, कोट्यवधींचे घोटाळे आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे भाजपविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष होता. या निवडणुकीत जनतेने त्याचा स्पष्ट निकाल दिला आहे.

या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शहरातील विविध प्रभागांत घवघवीत यश मिळवत भाजपचा पराभव केला.. या निवडणुकीत काँग्रेसचे २८ नगरसेवक जिंकले असून जनविकास सेना यांचे तीन नगरसेवक काँग्रेस बरोबर आहेत. पक्षाने तिकीट न दिलेले आणि बंडखोरी करून दोन अपक्ष उमेदवार हे निवडून आले आहेत.ते देखील चंद्रपुरात काँग्रेस बरोबर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ६ जागा जिंकल्या आहेत. ही आकडेवारी पाहता चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसणार, चंद्रपुरात सत्ता स्थापन करणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी आज स्पष्ट केले.

विजयानंतर काँग्रेस कार्यालयासह शहरातील विविध भागांत विजयोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. नागरिकांनीही काँग्रेस नेतृत्वावर विश्वास दाखवत चंद्रपूरचा विकास काँग्रेसच्या हातूनच शक्य असल्याची भावना व्यक्त केली. आ. विजय वडेट्टीवार यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करताना,
हा विजय सत्तेसाठी नाही, तर जबाबदारीसाठी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत पारदर्शक, स्वच्छ आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी चंद्रपूरवासियांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here