
गोडवा तीळगुळाचा
मकर संक्रांतीला चाखायचा
खमंग गुळ पोळीचा
मनसोक्त आस्वाद घ्यायचा
दुरावा संपवण्याचा
छान आहे हा मार्ग
जवळीक साधण्यात
नात्यातील स्वर्ग
काळी साडी नेसून
घालू हलव्याचे दागिने
हळदीकुंकू करुन
लुटुया सुगडांची वाणे
बाळलीला बालकांच्या
मन आनंदीत होई
बोरनहाणाच्या वेळी
उत्साह भरुन राही
तिळाची स्निग्धता
गुळाचा गोडवा
गोड गोड बोला
मंत्र जपावा
तीळगुळ सांगे सकलां
नैमित्तिक गोडी नसावी
एकमेकांच्या नात्यात
प्रेमगंगा सतत वहावी
भारतीय परंपरेला
शास्त्रीय बैठक आहे
मानावे महत्त्व सणांचे
मनोभावे साजरे व्हावे
(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे















