prabodhini news logo
Home अमरावती प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाती

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाती

0
85

प्रत्येक नात्यांशी मी इमानदारी केली
पण प्रत्येक नात्यांनी माझ्याशी बेइमानी केली

माझ्या इमानदारीला सर्वांनी माझी कमजोरी समजली
माझ्या भावनांना सर्वांनी माझी मुर्खता समजली

आता नात्यांना समजून घेणं, अवघड वाटू लागलं
दगडाखाली दाबून ठेवावं, अस प्रत्येक नात्यांनी केलं

माझ्या कष्टाला सर्वांनी माझं नाशिब समजलं
माझ्या सहनशीलतेला सर्व
नात्यांनी मजबूर समजलं

आता सर्व काही जीवाला
असह्य होऊ लागलं
नात्यांना समजून घेणं
कदाचित मलाच नाही जमलं

प्रा.सिम्रेला देशमुख
अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here