prabodhini news logo
Home कर्नाटक प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – मकरसंक्रांत

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – मकरसंक्रांत

0
81

नवीन वर्षात आला सण संक्रांत
रविराजाचा प्रवेश मकर राशीत
बदल होतो लगेच वातावरणात
लहान थोर असतात आनंदात

मकर संक्रांत सण नात्याचा
स्नेह संबध वाढविण्याचा
मतभेद बाजूला सारण्याचा
उत्साहाने एकमेका भेटण्याचा

वर्दळ घरोघरी हळदी कुंकवाची
सौभाग्याचं वाण लुटण्याची
हौस बायकाना नटण्याची
आपली संस्कृती टिकविण्याची

गुळाचा तिळाला गोडवा आला
तोंडांत घालताच विरघळला
तोंडातून शब्द हळूच आला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला

प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here