
अनोळखी नाते आपुले
नाते ठरले ऋणानुबंधाचे
जीवनसाथी होता आपण
पवित्र बंधन युगुल नात्याचे.
सहवासी येता ओळख पटली
भेट आठवली पहिली
वहिली
भास म्हणू का आभास म्हणू
मनाने मनाला सांगितली.
रूप नवे नाव नवे
पण आत्मभाव होता
खास
अनोळखी नात्याचा त्या
साथ जन्मजन्मांतरीचा
वास.
संसार आपला शिव-शक्तीचा
मिलन होते युगायुगांचे
खेळ खास नियतीचा
नाते होते युगबंधनाचे.
अंजली गरगटे.(पुणे)















