prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाते

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाते

0
82

नाव नाही, गाव नाही,
तरीही ओढ वाटते,
अनोळखी या नात्याची,
एक वेगळीच गोड वाटते…१.

कधी शब्दांतून भेटतो,
तर कधी मौनातून बोलतो,
ओळखीच्या गर्दीतही,
फक्त तुलाच शोधतो…२.

ना रक्ताचे हे बंध,
ना जुने काही संदर्भ,
तरीही मनाला मिळतो,
एक वेगळाच गंध…३.

सावलीसारखा सोबती तू,
पण चेहरा तुझा अस्पष्ट आहे,
हे अनोळखी नाते आपले,
शब्दांच्या पलीकडे सुस्पष्ट आहे…४

कधी न संपणारा प्रवास हा,
न मिळालेल्या उत्तरासारखा,
अनोळखी असूनही तू,
अगदी जवळच्या माणसासारखा…५.

स्वरचित रचना 
सौअनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here