
कधी, केव्हा ,कुठे, कसे ,काय
नकळत जुळले
मज चाहुलही न कळली अण
अनोळखी नात्यात मी गुंफले! १!
मन झाले अधीर, अनोळखी
नात्यात गुफंताना होईल काय फजिती,
गुंतले की कळेल मज, येईल
कशी त्याची प्रचिती! २!
मनात आली भीती दाटून
पहिल्यांदा भेटेल जेव्हा त्याला
कसे असेल हे नाते टिकेल का
हे आठवुन! ३!
नव्हते कुठले साधन
नव्हता कुठला छंद
मोबाईल च्या सानिध्यात
अनोळखी नात्यासोबत जुळले ऋणानुबंध ! ४!
अनोळखी नात्यातली ओळख
ही जीवनी अनमोल ठरली
न पाहिले एकमेकास तरीपण
आयुष्यात माझ्या खूप काही !
शिकवुन गेली! ५
कुमुद फुलझेले, नागपूर















