prabodhini news logo
Home ठळक बातम्या २१ पासुन खमारी येथे श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन

२१ पासुन खमारी येथे श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन

0
89

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – श्री. सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थान समिती खमारी (बुटी) तसेच समस्त खमारी ग्रामवासी यांच्या संयुक्त सहकार्याने बुधवार दि. २१ ते २७ जानेवारी २०२६ पर्यंत कथामृत संगितमय श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन वैनगंगेतीरी श्री सार्वजनिक हनुमान मंदिर खमारी (बुटी) च्या प्रांगणात करण्यात येणार आहे.

उद्घाटन बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ ला दुपारी २ वाजता श्री महाविर हनुमान मुर्तींचे अभिषेक आणि श्रीमद् भागवत अधिष्ठानाची स्थापना तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे.

उद्घाटन आदर्श शेतकरी बाबुराव मोहरकर व सहउद्द्घाटन सदाशिव किनारकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वैद्यकीय डॉ. पी. एस. डोंगरवार राहतील. प्रवचनकार ह.भ.प. भुसारी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून प्रवचन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती राधाकिसन काब्रा, अनिल सार्वे, जिल्हा परिषद सदस्य रजनिस बन्सोड, पं. स. सदस्य किशोर ठवकर, पं.स. सदस्या स्वाती विकेश मेश्राम, सरपंच नलिनी काळे, उपसरपंच आशिष लांजेवार, सर्वश्री ग्राम पंचायत सदस्य, अज्ञान राघोर्ते, प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. के. वाहणे, मुख्याध्यापिका जयश्री वाघाये, सौ. गीता मोटघरे, ओमप्रकाश मडामे, एम. एन. पवनकर, के. एन. पवनकर, सुरेश फेंडर, व्ही.टी. बन्सोड, डॉ. यशवंत मडामे, रामभाऊ खोब्रागडे, झिबल ठवकर, पढ़ारे ग्रामसेवक, क्रिष्णा शेंडे, सरपंच हर्षवर्धन घोनमोडे, सहषराम कांबळे, सामाजिक कार्यकर्ते हितेश सेलोकर, डॉ. सचिन निबार्ते, प्रभुजी फेंडर, परमानंद टेंभुर्णे, राजुजी लुटे, अशोक फेंडर, उत्तम ठवकर, बबन भोयर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बालाराम पवनकर आणि समस्त ग्रामवासी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

*दैनंदिन कार्यक्रम*
*भागवत प्रवचन* *दररोज सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत सायंकाळी ८ ते १० वाजेपर्यंत*,
*रामधुन* *दररोज पहाटे ५ वाजेपासून हनुमान मंदीरामधून निघेल*.
*हरिपाठ दररोज* *सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत होणार आहे*. *शोभायात्रा सोमवार ला दि. २६ जानेवारी २०२६ ला सकाळी १० वाजता हनुमान मंदिरामधून निघेल. जागृती सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ ला रात्री १० वाजता होणार आहे.

दहीहंडी तसेच महाप्रसाद मंगळवार दि. २७ जानेवारी २०२६ ला दुपारी १२ ते ३ वाजता भगवान गोपालकृष्णाचे निजधाम गमन भागवत समाप्ती, महायज्ञ, गोपालकाला व महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.

दहीहंडी तसेच महाप्रसाद कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून खासदार प्रशांत पडोळे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी शिक्षण राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुधे, जिल्हा परिषद सदस्य विनोद बान्ते, पंचायत समिती उपसभापती प्रशांत खोब्रागडे, पालांदुरकर, ग्रामविकास संस्थेचे संस्थापक दिलीप बिसेन, सामाजिक कार्यकर्ते मनोहर खरोले, सेवानिवृत्त सैनिक लक्ष्मण वाट, प्रशांत लांजेवार, घनश्याम कुंभलकर, प्रशांत कोल्हे, विनायक गभणे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी जिल्ह्यातील समस्त भाविक बांधव व नागरिकांनी जास्तीत -जास्त संख्येने अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा आणि तन-मन धनाने हनुमान मंदिराच्या बांधकामाकरीता सहकार्य करावे असे आवाहन श्री सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष खुशाल शहारे, उपाध्यक्ष वामन नागपुरे, सचिव सत्यानंद रेहपाडे, सेवक बोरकर, गजानन पेशने व श्री सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थान समितीच्या पदाधिकारी व खमारी ग्रामवासी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here