prabodhini news logo
Home ठळक बातम्या बायोमायनिंग प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

बायोमायनिंग प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

0
149

मोजीस परमार
विशष जिल्हा प्रतिनिधी,ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564

मिरा-भाईंदर – २२ जानेवारी २०२६ मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी राबविण्यात येत असलेल्या बायोमायनिंग प्रकल्पाची आज महापालिका आयुक्त मा. राधाविनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान प्रकल्पातील कामांचा आढावा घेत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून साचलेल्या अंदाजे १ लाख मेट्रिक टन जुन्या कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण करून पुनर्वापरयोग्य साहित्य वेगळे करण्यात येत आहे. तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
बायोमायनिंग प्रक्रियेमुळे परिसरातील दुर्गंधी कमी होऊन आरोग्य व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पाहणीदरम्यान आयुक्तांनी प्रकल्पस्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामातील अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक त्या सूचना दिल्या.
सध्या या ठिकाणी १० हजार मेट्रिक टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण झालेली असून उर्वरित काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच कामकाजात गुणवत्ता, सुरक्षितता आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात आला.
घनकचरा व्यवस्थापनातील बायोमायनिंग प्रक्रिया नियोजित कालावधीत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असून, त्यामुळे शहरातील साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न प्रभावीपणे मार्गी लागणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here