
चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. 22 : केंद्र शासनाच्या सिपडा योजनेअंतर्गत राज्यात कार्यान्वित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या धर्तीवर नमो अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सोयीसुविधा व मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हयात दोन याप्रमाणे 72 आणि मुंबई शहर व उपनगरसाठी अतिरिक्त एक असे एकूण 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्रे सुरु करण्यात येणार आहे. सदर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राव्दारे शासनाच्या कृती आराखडानुसार सेवासुविधा व दिव्यांग व्यक्तींना सल्ला मार्गदर्शन केंद्र, कृत्रिम अवयव, युडीआयडी प्रमाणपत्र इत्यादी बाबी नुसार निवड केली जाणार आहे.
त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात नॅशनल ट्रस्ट अंतर्गत नोंदणी केलेल्या स्वयंसेवी संस्था तसेच दिव्यांग हक्क अधिनियम 2026 नुसार उपक्रमासाठी नोंदणी प्रमाणपत्र घेतलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या इच्छुक लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावा, असे आहवान जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले आहे.















