prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – निसर्ग

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – निसर्ग

0
82

निसर्ग माझा सखा सोबती
तो आपला आधार काठी
देवरूप होवूनी उभा आहे
स्वनिर्मित जगासाठी. (1)

निसर्ग आपला आहे गुरू
अबोल निरंतर कृतीतून
शिकवतो
मानवी मूल्यांची शिकवण देत
सर्वांचे जीवन सुखी समृद्ध करतो.(2)

निसर्गा ठायी आहे पंचमहाभूतांचा वास
पालन ,पोषण,संवर्धन
आणि जतन खास. (3)

भारतीय संस्कृतीने जाणले
महत्त्व अद्भूत निसर्गाचे
सण समारंभ गुंफले
रक्षण वर्धन करीत त्याचे. (4)

स्वार्थाला घालू लगाम
रक्षण करणे कर्तव्य मानवाचे
निसर्ग हाच देव जाणून.
वर्तन करू कृतज्ञ भावाचे. (5)

अंजली गरगटे.(पुणे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here