prabodhini news logo
Home कर्नाटक प्रबोधिनी मंच महाराष्ट्र राज्य साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुभाषचंद्र बोस

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र राज्य साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुभाषचंद्र बोस

0
89

भारत मातेचा सुपुत्र महान
सर्वस्वाचे करुनी बलीदान
दिले ब्रिटिशांना हाकलून
देशभक्ती होती नसानसातून

भाषेतील त्यांच्या शैलीला धार
त्या शस्त्राने केला कणखर प्रहार
आझाद सेनेने केला आर्त पुकार
दिला जयहिंद नारा भारतभर

नेता सुभाषचंद्र तेजस्वी हिरा
नभी चमकतो शुक्राचा तारा
तुम मुझे खून दो चा दिला नारा
आवाजांन दुमदुमला भारत सारा

कित्येक वेळा भोगला तुरुंगवास
विसरून गेले अपुल्या घरदारास
पारतंत्र्यातून सोडविण्याची आस
धरली होती नेताजींनी खास

काळानी नेले त्यांना हिरावून
गेले हृदयावर नाव कोरून
नेताजी सुभाषचंद्र बोस महान
त्यांच्या स्मृतीस त्रिवार नमन

प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here