
अंधारयुगाचा अस्त होऊन
नवयुगाची सुरुवात झाली;
भारताची नवी राज्यघटना,
नवविचार घेत अंमलात आली.
महान प्रजासत्ताक दिनी
उजळलं देशाचं भविष्य;
तळागाळातील माणसांचं,
सुरक्षित केलं सारं आयुष्य.
धर्मांधतेला बाजूला सारून
धर्मनिरपेक्षता रुजू झाली;
प्रत्येक धर्माला समान ठेऊन,
मानवता नांदायला लागली.
स्वातंत्र्य- समता- बंधुतेचं
देशभर उभं राहिलं पीक;
लोकशाही विचारासाठी,
भारत देश ठरला सुपीक.
प्रत्येक मताला समान मुल्य
स्थापित केली समानता;
श्रीमंत असो वा असो गरीब,
लोटली दूर सारी विषमता.
साऱ्या जगात सर्वश्रेष्ठ
भारत देशाचे संविधान;
आदर करावा प्रत्येकाने,
राखावा देशाचा अभिमान .
रवि ताकसांडे
गडचांदुर जि.चंद्रपूर















