
निसर्ग माझा सखा
निसर्ग माझा गुरु
निसर्ग माझा श्वास
निसर्ग माझा कल्पतरू
जीवनास आवश्यक
देतो निसर्ग ऑक्सिजन
त्यापासून मिळते आम्हा
सौंदर्याचे खरे धन
फुले, फळे मिळती आम्हा
सगळे उपयुक्त छान
निसर्गात रमुन जाते
आपले एकाकी मन
निसर्गाची किमया न्यारी
मिळतो आयुर्वेदिक दवा
गवती चहा,तुळशी,कोरफड
निसर्गाचा अनमोल ठेवा
सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज ठाणे















