
आजच्या आधुनिक युगात मानव निसर्गाला साधारण समजत आहे, निसर्ग हा मानव जातीला महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे.
मानवी जीवनासाठी हा मोठा आशिर्वाद आहे.
निसर्ग हा जगातील सर्व प्राणी वनस्पती आणि इतर
गोष्टीचा संदर्भ देतो ज्या लोकांनी बनवल्या नाहीत.
ज्या घटना आणि प्रक्रिया ज्या लोकांमुळे होत नाही.
असा तो निसर्ग त्यामध्ये सुत्सामी, भूकंप, चक्रीवादळ
जीवाश्मिकरण ,निर्जीव संबधित प्रक्रिया असतात,
नैसर्गिक गोष्टी मानवजातीच्या हस्तक्षेपाशिवाय सर्व गोष्टीचा संदर्भ देतात ज्या निसर्गाने स्वतः च तयार केल्या आहे . या विश्वात अशा काही समान गोष्टी आहे. ज्यांना नैसर्गिक म्हटले जाऊ शकते, त्या जिवंत किंवा निर्जीव असू शकतात, नैसर्गिक गोष्टी या निसर्गाची देणगी आहे, आणि या गोष्टी मानव निर्माण करू शकत नाही
नैसर्गिक गोष्टींची काही उदाहरणे आहेत, ते चंद्र सूर्य
तारे, नदी ,ढग, पर्वत , दऱ्या ,जंगल ,पाऊस, पाणी
मानवता आणि निसर्ग यांच्यातील सहजीवन एक परिपूर्ण
आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आल्यामुळे तुम्हाला केवळ
भावनिक दृष्ट्याच चांगले वाटत नाही, तर तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी ही चांगले असते, शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार त्यामुळे मुत्युचे प्रमान कमी होते, पाच घटकांच्या सिध्दांता – नुसार प्रत्येक गोष्ट या पाच घटकापासून बनली आहे,
पुथ्वी, पाणी ,अग्नी ,वायू , आणि अवकाश हे निसर्गाच्या
जटीलतेचे स्पष्टीकरण आणि सोप्या पदार्थामध्ये विभाजन करून स्पष्टीकरण म्हणून आहे. निसर्ग ही आपल्याला लाभलेली अनमोल देणगी आहे.
आपल्याला श्वास घेण्यासाठी हवा देते, पिण्यासाठी पाणी
देते, घर बांधण्यासाठी जागा व माती देते. भाज्या फळे
धान्य खाण्यासाठी अन्न देते. त्यामुळे आपणही निसर्गाचा समतोल ढासळू न देता त्याचा आनंद घेतला पाहिजे .
नैसर्गिक जग अविश्वसनीय व आश्चर्यकारक आहे, जे आपल्याला प्रेरणा देते . ती आपली अर्थव्यवस्था समाज
सांभाळते, आपल्या अस्तित्वाला आधार देते,
निसर्ग आपल्याला आणि सुसंवादाचे जिवन महत्व आणि
जिवनातील छोट्या छोट्या गोष्टीचे कौतुक कसे करावे ते
शिकविते. आपण निसर्ग सौंदर्याची आणि धरणीची प्रशंसा करू शकतो, त्याच निसर्ग सृष्टीला आणि जमीनीला आपण आईचा दर्जा देतो.निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मनाला शांती, आनंद आणि ताजेतवाने वाटते. तनाव कमी होते एकाग्रता वाढते, चिंता नैराश्य कमी होते, विचारांना नवी दिशा देते ,सृजनशीलता निर्माण होते. मानसिक शारिरीक आरोग्य लाभते.
निसर्गाचे सानिध्य आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे.
धरणीचा आणि मातेचा खुप जवळचा जिव्हाळ्याचा संबंध आहे.थोडक्यात सांगायचे तर निसर्गाच्या सानिध्यात राहणे.
म्हणजे स्वतः ला निसर्गाशी जोडून घेणे. जे आपल्यासाठी
सर्वागीण विकासाचे आहे. संत तुकाराम महाराज
निसर्गाशी समरूप झालेले थोर संत होत ते म्हणत
” वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ” निसर्ग म्हणजे पशू पक्षी झाडे वेली आपले आप्तस्वकीय मानले . निसर्गामध्ये सजीव सृष्टी मध्ये इश्वर वसलेला आहे असे ते सांगतात. पशुपक्ष्याना सगेसोयरे मानल्यामुळे निसर्गाशी भावनिक नाते जोडल्या गेले झाडे झुडपांनी बहरलेली निसर्ग संपत्ती मनाला प्रसन्न करते.नवचैतन्य फुलवते म्हणून माणसाने निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. तरच निरोगी आयुष्य जगता येईल. परंतु आजकाल सगळे उलटे होताना दिसत आहे .
जिकडे तिकडे जंगल तोंड होत आहे, कधी समृद्धीनावावर तर कधी कुंभमेळ्याच्या नावे जंगल कटाई चालवली आहे.
कधी वनव्यात जंगल संप्पतीचा नाश होते . जीवाश्म इंधन जाळणे, प्रदुषण या सारख्या बदलामुळे हवामान बदल मातीचा धुप ,खराब हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात विलुप्त होणे, आणि पिण्यायोग्य नसलेले पाणी, यासह परिणाम उद्भवतात. व जंगलात तील प्राणी गावात येवून धुमाकूळ घालतात , आपल्या हाताने आपण माणव आपत्ती,संकट ओढवत आहोत, जंगल संप्पती निसर्गाचे रक्षण करण हे आपले सर्वाचे आद्य कर्तव्य आहे.
निसर्ग आपल्या शिवाय अस्तित्वात असू शकते पण निसर्गाशिवाय आपण अस्तित्वात राहू शकत नाही . आपण कितीही श्रिमंत विकसित आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत असलो तरी शेवटी निसर्ग हा आपल्या मानवी अस्तित्वाचा पाया आहे आणि मानवी लवचिकता आरोग्य स्थिरता आणि कल्याणाची गुरूकिल्ली आहे एवढे मात्र निश्चित.
नंदा भगत / कारंजा लाड
वाशिम















