
आपल्या देशाला स्वातंत्र्य
मिळवून देणाऱ्या लोकांमध्ये l
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा
मोठा वाटा आहे देशामध्ये l
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील
नेताजी होते एक नेते महान l
घोषणा दिली तुम्ही मला रक्त
द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन l
आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून
ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला l
महात्मा गांधींच्या अहिंसेपेक्षा
ब्रिटिश नियंत्रणाचा प्रतिकार केला l
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष
झाले महात्मा गांधीशी मतभेद l
जापानच्या मदतीने आझाद हिंद सेना
स्थापून केला भारत मुक्तीचा आशावाद l
भारतात अनेक स्थळे संस्थांना नाव
नेताजीचे धैर्य देशभक्ती बलिदान l
त्यांचा रहस्यमय मृत्यू जनतेला
मोहित करत आहे अजून l
नेताजींचा धाडसी लढाऊ दृष्टिकोन
प्रबळ विचारधारा श्रद्धा देशासाठी l
सोडली आयसीएस पदवी एकता
नियोजन शिस्त त्याग स्वातंत्र्यासाठी l
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















