
उंच उंच झेंडा आम्ही
आज फडकवू गगनावरती
मिळाले स्वतंत्र आम्हाला
आम्ही राज्य करू जगावरती।।
आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. याच दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आली. आणि खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला असे म्हणता येईल. सर्वच देशात आप आपली राज्यघटना आहे. त्यामुळे भारतालाही स्वतंत्र राज्य घटना म्हणून एक समिती स्थापन करण्यात आली. आणि यात अनेक नेते सहभागी झाले .पण काही कारणांनी सर्वांनी माघार घेतले आणि याची संपूर्ण जबाबदारी डॉ .भीमराव आंबेडकर यांच्याकडॆ आली. आणि राज्यघटना लिहिण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिवस रात्र एक करून महान अशी भारताची राज्यघटना लिहिली .
आणि ही राज्यघटना जगातील सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना ठरली. भारतीय राज्य घटनेचे अनेक मूल्य हक्क कर्तव्ये नमूद करण्यात आली आहे .आणि याच राज्यघटमुळे भारतात लोकशाही प्रस्थापित झाली. लोकशाहीमुळे स्वातंत्र्य समता बंधुत्वता आपले हक्क मिळाले आपले अधिकार आपणास प्राप्त झाले. तसेच26 जानेवारी 1950 हे संविधान संपूर्ण लागू झाले आणि खऱ्या अर्थाने लोकशाही अंमलात आली त्यामुळे प्रजासत्ताक दिन सर्व लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. प्रजासत्ताक दिनांनिमित्ताने शाळेत महाविद्यालयात वेगळेवेगळे उपक्रम राबविले जातात. स्पर्धा आयोजित केल्या जातात तसेच दिल्ली येथे राजपथावर राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते व वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते .तसेच सर्व लोकं आपल्या आपल्या घरा घरात रांगोळी काढून हा सण साजरा करतात.
26 जानेवारी म्हंटले की आपल्या मनात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. आपल्या मनात देशाबद्दल अभिमान आणि प्रेम जागृत होते. आणि आपला राष्ट्रीय उत्सव मोठ्या आनंदाने सर्वजण साजरा करतात. तसेच जे शहीद वीर जवान यांना त्यांची आठवण म्हणून राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देऊन गौरव करतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचे वेगळे महत्व ठळकपणे दिसून येते.
भारत आपला देश महान
गाऊ चला देशाचे गुणगान
तिरंगा झेंडा राहू फडकत
विश्वावरती फडकवू निशाण।।
सर्व माझ्या देश बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।।
।।गणतंत्र दिवस चिरावू होवो।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर















