
प्रभु निर्मीत ही अनुपम सृष्टि
अमूल्य खनिजतत्वांची वृष्टि
एकही नाही त्यात चौकीदार
सुदंर प्रभुने व्यवस्था केली
जपुया आपण मिळुन पर्यावरण
ओसंडुन वाहतील नद्या नाले धरण
वृक्षतोड ,वायुध्वनी,जल प्रदूषण
कोरोना चे आले दुषण
धोक्यात आले असंख्य प्रजाती जीवन
प्लास्टिक चे दुष्परिणाम प्रकृति ला
हा राक्षस गिळणार सृष्टीला
जपु आता मातृ संस्कृतिला
आकाश वायु अग्नि जल पृथ्वी
पंचतत्वाच्या जाणु गोष्ठी
सर्जन विसर्जन पोषण
पंचतत्वानीं आहे रोशन
आकाशतत्व सर्वव्यापक स्थीर
वायुगती ने नित्य श्वासोश्वास
अग्नि ऊर्जावान तेजस्वी प्रकाश
पृथ्वी माता सहनशील क्षमावान
निसर्ग आहे परीवर्तनशाली
हवा आली उष्णता पळाली
प्रकाश येता अंधारा ची अस्ति
अनुपम काव्यात्मकम भरारी
उपमा नाही त्याला कसली
विजया रमेश सोनी
सुरत गुजरात















