
निसर्गाची किमया न्यारी
थंड, वारा घनदाट सावली
निसर्गरम्य वातावरण
सतत आपल्या पावलो पावली…१
झाडे लावून करूया संवर्धन
पाणी, कुंपण करूया संगोपन
जिकडे तिकडे दिसेल हिरवळ
वाचवू या निसर्ग पर्यावरण……२
फुले, फळे किती उपयोगी
पाने, मुळे, खोड औषधी
लाकडापासून वस्तू निर्मिती
काहीच वाया न जाते कधी…..३
किती सुंदर निसर्गाची देन
मानवाच्या जीवनास अनमोल भेट
फुलांपासून मिळते सुगंधित सेंट
गाऊया तयांचे गुणगान थेट…..४
कार्बनडाय ऑक्साईड वायू घेवून
देती आपल्याला आक्सिजन
आपल्या जिवनास ठरते अनमोल
करुया आपण निसर्गाचे संवर्धन…..५
सौ रंजना धर्मपाल आटे
जिल्हा वर्धा















