
उगवता प्राचीवर गोल,
लाजरी उषा बावरी,
घेऊनी निरांजन,
करूनी औक्षण,
दिनकरास गाऊनी गीत सुस्वर.
लाल पैठणी नेसुनी,
दवाचे मोती उधळुनी,
हर्षित झाले विहंगम,
छेडिती कीलंबिल धून,
सृष्टीदेवी करी नर्तन,
असे हे सुंदर नवयौवन.
हळूहळू वरवर येता दिनकर,
प्राजक्ताची फुले धरणीवर,
गुलाब, जाई, जुई, मोगरा,
सुगंधाने उधळे परिसर,
अशाच मंगल वातावरणी
वसुमती ही करी साज.
सृष्टीचे तीन ऋतू असती,
परस्परांशी अखंड नाती,
ग्रीष्माची दाहक चाहूल,
धरणी करी अनुनय नभास,
ये रे ये रे जरा,
वर्षवी वर्षवी रे जलधारा.
रिमझिम रिमझिम वर्षती धारा,
मेघ वाजवी ढोल-नगारा,
सप्तरंगी धनुष्ये आकारा,
कडकत विजा टाळ वाजवी,
नर्तन करी अंबर.
तृषार्त धरणी जल करिते प्राशन,
वसुंधरा स्मित करी स्नेहान,
जिकडे तिकडे हिरवेगारपण,
शीतल वारा शिळ वाजवीत,
गात असे मल्हार.
कृषीवलांची सारी लगबग,
शेती करिता चाले धडपड,
राजा-परधान्यांची जोडी
पळत असे रानोमाळ.
असे हे निसर्गचक्र अनिवार,
औषधीयुक्त वनस्पती अपार,
तुळस, गवतीचहा, आले, हळद, तिखाळी,
अवदुंबर, कोरांटी, सुपली,
कितीतरी जडीबुटी,
निसर्गाने दिले हे दान,
मानवासाठी उपकार महान.
निर्मला बोरकर, नागपूर















