prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – निसर्ग

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – निसर्ग

0
114

निसर्ग म्हणजे सौंदर्याची खाण
तिथे नाही कशाचीही वाण
पिण्यासाठी जल, शेतीसाठी जल
विजनिर्मीतीसाठी जल नदी देते प्रत्येक क्षण

सुर्य देतो प्रकाश दिवसभर
तमाला तोच दुर सारतो
सौर उर्जेवर दिवे लागतात
तुम्हाला कधी बील मागतो

वृक्ष आम्हाला छाया देतात
प्राणवायू सदोदीत पुरवितात
जमीनीची धुप थांबवितात
रसभरीत मधुर फळे देतात

काळी आई धरणी आमची
अन्न धान्याची पुरवठा अधिकारी
तुट नसते तीच्या घरी कधीही
कृत्रिम टंचाई निर्माण करी व्यापारी

पशु ,पक्षी झाडे आमचे सांगाती
का घाव झाडावर घालतोय
का नदीला प्रदुषित करतोय
कुठला विकास आमचा होतोय

एवढा सुर्य प्रकाश असताना
का उसना झगमगाट दाखवतोय
आवाजाचा बेफाम जलौष कशाला
आत्ममग्न गुंगीत का आम्ही जगतोय

खनीजे जमीनीच्या असे पोटात
आम्ही किंमत लावतोय रुपयांत
निसर्गाचे जतन आपण करायचे
निसर्गाचे उपकार अनंत जिवनात.

शोभा वेले, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here