
कडाडली ती वीज पुन्हा,
नभी गर्जला सिंह तो,
ज्याला बघूनी आंग्ल भूमीचा
थरथर कापे देह तो!…१.
नमन त्या वीरास ज्याने ‘चलो
दिल्ली’चा नारा दिला,
देशाच्या स्वातंत्र्यासाठी
संसाराचा होरा दिला…२.
’तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा’
अशी गर्जना ज्याने केली,
मरगळलेल्या मनामनांत मग,
नवी उभारी भरून आली…३.
त्यागाची ती मूर्ती मोठी,
‘आयसीएस’चा त्याग केला,
स्वातंत्र्याच्या अग्निकुंडी
स्वतःचा देह अर्पिला…४.
आझाद हिंद फौज उभारून
शत्रूला ज्याने नमविले,
पराक्रमाच्या गाथेने अवघे
विश्व मग थक्क झाले…५.
रक्त सांडले भूमीसाठी,
नाहले ते क्रांतीच्या धारा,
जय हिंदचा मंत्र देऊन,
उजळला हा देश सारा…६.
कुठे हरवला तो सुपुत्र,
शोध आजही संपत नाही,
पण भारतीयांच्या हृदयात,
‘नेताजी’ अमर आहे पाही!..७
स्वरचित कविता
सौ अनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाणा















