prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – संकल्प नववर्षाचा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – संकल्प नववर्षाचा

0
26

संकल्प नव वर्षाचा
नव नवे प्रकल्पांचा
नूतन आगमनाचा
नवीन त्या विकल्पांचा

प्रण घेऊया नवीन
दुःख मिटावे सर्वांचे
राग क्लेश मुक्त हो
सुख लाभावे शौर्याचे

नवीन वर्षाचे गीत
गाऊ या आत्मे महान
अज्ञान दूर करूया
वाढवूया बुद्धी ज्ञान

जुन्या आठवणी सोड
नाविन्याशी नाते जोड
नवे पर्व नवी आशा
नव्या विचारे नवी दिशा

या सर्व आपण मिळू
नववर्ष साजरा करू
सर्वांना शुभेच्छा देऊ
नवीन अध्याय लिहू

गेल्या जुन्या आठवणी
शिकवण त्याची घेऊ
नव्या सोनेरी पहाटे
नवीन कहानी लिहू

नवीन आशा आकांक्षा
घेऊन सोबत चालू
या सर्व मिळूनी सारे
नवीन भारत आकारू

कवयित्री उज्वला वाल्मीक नगराळे
चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here