
निसर्ग राजाचा गंध
आण मातितला सुगंध
दरवळतो चोहीकडे
मानवी जीवनात छंद!! १!!
उंच उंच आकाशी गरुड घेऊन झेप करतो आभाळाला चुंबन
पक्षाचें थवे ही उडुनी आकाशी
निसर्गाला करतील वंदन!! २!!
जंगलात राज करणारा वाघ
मौज करतो वनामध्ये
तोडु नका हो झाडे
येईल तो शहरामध्ये!! ३!!
आंनदरम्य राहू देत धरती
लई उपकार आहेत तिचे जीवन जगण्यासाठी, पशु, पक्षी, प्राणी
कुठे शिरणार शहरात निर्भर आहे ती संपूर्णतः निसर्गावरती!! ४!!
खेड्याची गावे झाली, गावाची शहरे झाली
खोटे स्वप्न पाहत असताना
निसर्गाची हो किती हाणी
झाली!! ५!!
निसर्गाशी खेळणे महागात पडले
कल्पना नव्हती असे विपरीत घडले, शेवटी निसर्गाचे रक्षण करणे हेच मानवाला कळले!! ६!!
कुमुद फुलझेले, नागपूर















