prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतु

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतु

0
115

आम्रतरु मोहरला
कोकीळ गाऊ लागला
गंधीत मोगरा दरवळला
मोहक सोनचाफा बहरला

पानगळी वृक्षांवर कोवळी नवीन पालवी फुटली
हिरव्यागार पानांवर
रंगफुलांची उधळण जाहली.

वसंत ऋतुच्या आगमने
सारी सृष्टी बहरली
चैतन्य मयी स्पर्शाने
वनराणी मनोमनी मोहरली.

पक्षांच्या प्रेम अलापी
पहाट सूरमयी जाहली
तनामनावर रती -मदनाने
गहरी जादू केली.

आंबट गोड फळांची
रेलचेल जाहली.
थंड पन्हे कैरीची डाळ
जिभेवर चव रेंगाळली

वसंत ऋतूच्या कौतुक सोहळी
मने रंगूनीया गेली
अमूर्त रंगार्याने सृष्टीवर
रंगांची उधळण केली.

अंजली गरगटे.(पुणे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here