prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतु

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतु

0
118

आला वसंत साजिरा
चैत्र पालवी फुटली
मोहरली आमराई
कोकिळेच्या मधुकंठी

वसंत ऋतुचा गोडवा
पसरे खुल्या रानोमाळी
वाऱ्याची सळसळ होता
झुलती पाने तांबूस कोवळी

पळस पारिंग्याचा साज
केशरी रंगाची बरसात
सावरीच्या काट्यातही
फुले उमलती परसात

आला ऋतुराज वसंत
घेऊनी आनंदाचे क्षण
निसर्गातील सौंदर्याची
दाही दिशातुनी उधळण

सनईचे मंगल मधुरस्वर
घुमती लग्नमंडपातुनी
सजली वऱ्हाडी मंडळी
मंगल अक्षता हाती घेऊनी

पळसाच्या पानावरी
लग्न पंगत सजली
मांडवाच्या तोरणाला
लेकुरवाळी केळ आली

मनामनात पसरला
लाल कुसुंबी वसंत
वधु वरांना भेटण्यास
नाही मिळाली ऊसंत

सौ.वंदना शशिकांत पाटील, मुंबई 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here