prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – सांजवेळ

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – सांजवेळ

0
100

सांजवेळी अस्तास जाता जाता
पित केशरी किरणे सांडत होता
पश्चिमेला डोंगर उतरत होता
आकाशीचा राजा मावळत होता

होता सकाळी तो घेऊन आला
भरभरून सोनेरी तेजस्वी किरणांना
चैतन्याचा अनमोल खजिना
जीवनास जगणे शिकवताना

नभही घेतो त्याचीच ओढून आभा
निसर्ग, पशु,पक्षांना जीवनाची तृषा
श्वासांत चेतना तरंग उठवून आशा
जागृत सकारात्मक होते जीवन मनिषा

जातानाही ठेवून सारी आभा
दिप आशेचा सारा उजळला
जाऊन येईन पुन्हा उद्या मी
एक ज्योत तेववून रवि मावळला.

डाॅ. सौ.स्मिता सदानंद मुकणे
ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here