
दुपार संपल्यानंतर आणि
रात्रीच्या आधीचा वेळ l
सूर्य मावळण्याच्या वेळी
आसपासचा काळ सांजवेळ l
चोवीस तासाचे तीन टप्पे
संध्याकाळ म्हणजे सांजवेळ l
दोन संधी नंतर तिसरी सांज
उषःकाल नंतर प्रातःकाळ l
पश्चिमेला मावळणारा सूर्य
दिवसा थकव्यानंतर येणारी l
आकाशातील तांबूस रंगाची
वेळ शांत मनमोहक सोनेरी l
परततात पक्षाचे थवे घरट्याकडे
गुराखी परततो सोडून माळरान l
मंद वाऱ्याच्या झुळूकाचे सौंदर्य
प्रसन्न वेळ जे देते उद्याचे आश्वासन l
कमी दिवसभराचा कोलाहल
कामावरून परतणारे लोक l
ताण कमी खेळणारी मुले
बागेत फिरणारे जेष्ठ नागरिक l
हळूहळू सूर्य मावळायला लागतो
आकाशात हलका अंधार पडते l
दिवे कंदील लाईटस् लावले जातात
वातावरण शांत आणि प्रसन्न वाटते l
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















