prabodhini news logo
Home कर्नाटक प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतू

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतू

0
83

ही गान कोकिळा लाजरी
लपून अमराईच्या पाना आड
कानी पडता कुंजनं लहरी
आनंदानी बहरून जाते झाड

लागता चाहूल वसंत ऋतूची
गाते कोकिळा गोड स्वरांनी
उत्सुकता तिला पाहण्याची
मोहविते आपल्या आवाजांनी

किमया सारी निसर्गाची
धुंद करतो आंब्याचा मोहोर
चलबिचल वाढते मनाची
मधमाश्या धरती भोवती फेर

हळूच डोकावते कोवळी पालवी
सजुनी सृष्टी रंगीबेरंगी फुलांनी
स्वागता पाचोळ्यांनी धाव घ्यावी
वसंत ऋतूचे आगमन उत्साहानी

प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here