
आहे तुझ्यात मी अजूनही
त्या स्पर्शात आहे मी कुठेतरी…..
भेटलो होतो एका सांजवेळी
मग कसे दूर तू अन् मी एकावेळी
दिल्या शपथा काही दिली वचने होती
साथ जन्माची देशील तू बोलली होती
मग आज का हे दुरावे अन् भीती
नाही तुला मंजूर मी अन् ही प्रीती
बघ आरशात तू एकदा कधीतरी
तुझ्या दिसण्यात मी आहे कुठेतरी
आशालता भोसले.
इंदापूर, पुणे जिल्हा.















