prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतू

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतू

0
163

वसंत ऋतू हळूच येता
बहरला शिवार सारा
नव्या आशेचा अंकूर फुटला
सुटला थंडगार वारा…..!!

आल्हाददायक झाले वातावरण
प्रसन्नतेचे उगवले किरण
झाडे,वेली,बहरून आली
मदमस्त झाले वातावरण…..!!

वसंत ऋतूची चाहूल लागता
कळी कळी सर्व खुलली
गुलाबाच्या गाली,लाली
सुगंधात ती सर्व न्हाली…..!!

अदृश्य झाली धुक्याची चादर
तेजोमय सुर्य किरणांनी
फुलली जाई, जुई,चमेली
मोगराही दरवळला अंगणी….!!

सौ रंजनाताई आटे
जिल्हा वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here