
अनोखे बंधन असते
दोन व्याकुळ मनात
भेटण्यासाठी आतुर
प्रेमी प्रत्येक क्षणात
जीवापाड प्रेम त्यांचे
एकमेकांवर असते
दुर गावी असताना
मुळीच चैन नसते
जेवताना कधी त्यांच्या
घास अडतोय ओठी
आठवणी रात्रंदिन
वेळ कठिण मोठी
दोन प्राण त्यांचे असे
गुंतले मन एकमेकांत
दोघांचे घर मात्र असते
एक दुसऱ्यांच्या हृदयात
अशी अनोखी प्रीत असावी
दोन जीवलग जीवांची
ताटातूट कधी होऊ नये
अशा अनमोल बंधनाची.
शोभा वेले, नागपूर















