
सातवीच्या त्या वर्गात,
जेव्हा काळजाची धडधड
वाढली होती,
तेव्हा प्रेमाची ती पहिली
पाऊलखूण
आपल्या दोघांच्या मनात
उमटली होती…१.
परिस्थितीचं चक्र कसं
फिरतं पहा,
काल जे वळण माझ्यासाठी
कठीण होतं,
आज त्याच वळणावर तू
उभा आहेस,
जणू नशिबाने हे सारं
आधीच लिहिलं होतं….२.
तुला दोष नाही,
ना नशिबावर रुसवा,
कारण काळानुसार आपण
बदललो आहोत,
एकेकाळी एकमेकांसाठी
वेडे होतो,
आज मात्र समजूतदारपणाने
सावरलो आहोत…३.
हातात हात घेऊन चालण्यापेक्षा,
हातातून हात सोडणं जास्त
कठीण असतं,
पण एकमेकांच्या भल्यासाठी
घेतलेला हा निरोप,
खऱ्या प्रेमाचं सर्वात
सुंदर लक्षण असतं…४.
नसावा आता कोणताही
पश्चात्ताप,
ना मनात कोणती उरलेली तक्रार,
आपल्या ‘अनोख्या बंधनाचा’
‘ हा शेवट,
असेल आपल्या दोघांसाठी एक नवा प्रवास….५.
सौअनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना















