
चामोर्शी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – चामोर्शी : माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी नगरपंचायत चामोर्शीला सदिच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
चामोर्शी शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व इतर नागरी सुविधांच्या विकासाबाबत सकारात्मक चर्चा झाली. आगामी काळात शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजनांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. देवराव होळी यांनी सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच नागरिकांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थितांना नववर्षानिमित्त डायरीचे वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, सभापती वैभव भिवापूरे, निशांत नैताम, गीता सोरत, स्नेहा सातपुते, नगरसेवक सुमेध तुरे, अमोल गण्यारपवार, नितीन वायलालवार, राहुल नैताम, आशिष पिपरे, लौकिक भिवापूरे, नगरसेविका रोशनी वरघंटे, प्रेमा आईंचवार, माधुरी व्याहाडकर, वंदना गेडाम, सोनाली पिपरे आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी डॉ. होळी यांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत शहराच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, अशी भावना व्यक्त केली.















