prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गुलाब

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गुलाब

0
109

गूलाब पुष्प माळून केसात
ललना दिसते सुंदर, सुरेख
देवीचे रुप दिसे मनोहारी
सौंदर्याचा हाच आहे आलेख

चांदणभूल मनास पडली
चंद्राची कोर गगनी उगवली
प्रज्वलित तारे नभी चमचमता
गुलाब फुलांची पखरण पसरली

गुलाब केसात माळला की प्रेम
देवाच्या पायी वाहता मनी भक्ती
सरणावर वर्षाव करुनी दुःखद भीती
वेगवेगळे उपयोग वाढवी जीवन शक्ती

गुलाबाच्या सुंदर फुलाचे
आगळेवेगळे सौंदर्य हे
असे तरीही नशीबी त्याच्या
जाळे टोकदार काट्यांचे हे

अशी महती थोर असे जरी
काट्यांचा भोग येतसे नशीबी
सुखा समवेत दुःख ही साथी
कधीच विसरु नका ह्या बाबी

(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here