prabodhini news logo
Home कर्नाटक प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – माता रमाई आंबेडकर

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – माता रमाई आंबेडकर

0
87

दिनाची माऊली
दीन दुबळ्यांची माऊली रमाई
गरिबांची झाली ती सावली
जनता जनार्दनाची ती आई
सदैव संकटात मदतीस धावली

भीमरावांची ती अर्धांगिनी
घेउनी खांद्यावर जबाबदारी
समाज सेवेचे ध्येय उरी बाळगुनी
झडली सतत आयुष्य भरी

कणखर मूर्ती संयम त्यागाची
माया ममतेचा शांत सागर
मनी जाण ठेवुनी कर्तव्याची
गोर गरिबांचा चालविला संसार

ठेवला आदर्श महिला समोर
साधी राहणी उच्च विचार सरणी
आचरणात आणु त्यांचे विचार
नत मस्तक होते रमाई चरणी

प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here