prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता -निरागस हास्य

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता -निरागस हास्य

0
76

हास्य देवाची देणगी
मानवा लाभते वरदान
हास्य अलंकार मानवाचा
हसरा चेहरा दिसतो सान. 1)

निरागस हास्य बाळाचे
निरागस हास्य मैत्रीचे
निरागस भाव उमटती
आजीच्या बोळक्या मुखाचे.2)

निरागस हास्य पहाता
मनी पसरते चांदणे आनंदाचे
निरागसता जपून ठेवत
भान राखावे मानवतेचे. 3)

हास्य जोडते मनामनाला
प्रेम भाव वाढतो नात्यात
हसरी माणसे आवडती
सकलांस मैत्री भावात. 4)

फुलांच्या ठायी असतो
निरागस हास्याचा वास
आनंदात नाचती गाती
निरागस हास्यात देवाचा निवास. 5)

अंजली गरगटे
पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here